रविवार, २६ जुलै, २०१५

गणपती अनधिकृत ?



गणपती विघ्नहर्ता, बुद्धीची देवता ! या गणरायाचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम, म्हणून महाराष्ट्रातल्या घरोघरी दरवर्षी रहायला येतो.
लोकमान्य टिळकांनी विनंती केली म्हणून गणराय सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊ लागले. आरत्या, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम यांनी वातावरण पवित्र होतंय पाहून आनंदी झाले, अर्थात कोणी फार ध्वनिप्रदूषण केले कि डोळे वटारून त्यांना ठीक पण करु लागले. 
हळूहळू मैदाने, बागा, अंगणे नाहीशी झाली. अनधिकृत बांधकामाचे आदर्श सर्वत्र उभे राहू लागले. चाळी, गाळे, दुकानेच काय मोठे मोठे Tower  दाटीने उभे राहू लागले.   
उत्सव साजरा करायला जागाच उरली नाही. गणराय म्हणाले मी आता येत नाही. पण भक्तांचे डोळे पाणावले; भक्त म्हणाले आपण रस्त्यावर उत्सव करू, तू नाही म्हणू नकोस ! गणराय म्हणाले मुळातच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेले काही रस्ते तर Builder नि ढापलेले त्यात मी उभा राहून जनतेला त्रास कसा देऊ ?
भक्त म्हणाले समाज पैशाच्या मागे नीतीमत्ता विसरलेला, व्यसनात अडकलेला, TV आणि Mobile  मध्ये हरवलेला, तू येतोस ते दहा दिवस थोडे पवित्र असतात. गणपतीच्या १० दिवसात जनजागृतीचे देखावे होतात. सामान्याना आनंदाचे दिवस जातात. तू येण्याचे थांबवू नकोस.
गणराय नाईलाजाने अंग आक्रसून रस्त्यावर १० दिवस थांबू लागले.
अचानक आरडओरडा सुरु झाला. अनधिकृत बांधकामे व फेरीवाले वर्षभर रस्ते अडवतात, त्याविरुद्ध न बोलणारे अचानक गणपती उत्सवाविरुद्ध ओरडून बोलू लागले. शुक्रवारी रस्ते अडवणाऱ्या शांती दुतान्विषयी मूग गिळून बसलेल्यांना कंठ फुटला. अलिशान  गाड्या मधून वर्षभर फिरणारे, गणपती मुळे वाहतूक कोंडी व प्रदूषण होते अशी हाकाटी करू लागले.    
अनधिकृत बांधकामे नियमित करणारेच गणरायाला अनधिकृत ठरवू लागले.
गणपती पण आता न येण्याच्या विचारात आहे.
महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा जपायचा का नाही हे आता मराठी माणसाने ठरवायचे आहे.