गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

कुंभ मेळा - अलौकिक अध्यात्मिक पर्वणी !



कुंभ मेळा - अलौकिक अध्यात्मिक पर्वणी !
नाशिक येथे होणारा कुंभमेळा आषाढ अमावास्या शुक्रवार (दिनांक १४ ऑगस्ट) पासून सुरु होत आहे. हा अलौकिक सोहोळा दर १२ वर्षांनी होतो. या काळात गोदावरीत स्नान करणे हि परम पुण्य प्राप्तीची संधी आहे. खूप मोठ्या संख्येने योगी, साधू, संत, व अनेक अध्यात्मिक व्यक्ती तेव्हा महाराष्ट्रात येतात. अक्षरश: कोट्यावधी भाविक कुंभमेळ्यासाठी येतात. विदेशी नागरिक पण मोठ्या प्रमाणात येतात. कुंभमेळा हे जगातील सर्वात मोठे मानवी एकत्रीकरण असते. प्रयाग येथे २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेल्यामध्ये १० कोटी पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते व त्याचा जागतिक विक्रम नोंदवलेला आहे. कुंभमेळ्यातून १०००० कोटी पेक्षा अधिक व्यवसाय होतो.   
महत्वाचे म्हणजे आपली संस्कृती समजून घेण्याचे व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे ते उत्तम साधन आहे. अशा या अप्रतिम सोहोळ्याचे स्वागत करुया व त्यात सहभागी होऊ या !
(References: