सोमवार, १८ एप्रिल, २०१६

Hanuman



हनुमान जयंती उत्सव
रानगाव, वसई
येथे व्याख्यान देण्याचे भाग्य मला लाभले आहे.
विषय - "भक्तीतून करूया शक्तीची निर्मिती"
मंगलवार चैत्र शुद्ध १३, १९.४.२०१६ रात्री ८.३०


काही मुद्दे
हनुमान हे भक्ती, समर्पण, शक्ती, बुद्धी याचे मुर्तीमंत उदाहरण.
रामाच्या कार्यातील कुठलाही अडथळा हनुमान दूर करतात.
रामदूत म्हणून अलोकिक कार्य- लंकादहन – शत्रूच्या मनात भीती, बिभिशानाचे मन परिवर्तन
अहि रावण, मही रावण यांना मारणे .
संजीवनी आणणे  अशी अनंत कामे

हनुमान ही श्री रामापर्यंत पोहोचण्याची किल्ली आहे "श्रीमत् हनुमान् कीलकम् । "
अध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर हनुमान म्हणजे वायुतत्व. आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी वायुतत्व प्रसन्न करून घ्यायला हवे.
अष्टांग योग मध्ये, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, .. अशा पायर्या सांगितल्या आहेत. अध्यात्मिक साधनेत पुढे जाण्यासाठी प्राणशक्ती हवी.


वैयक्तिक उन्नती साठी आपल्याला देह्बुद्धीरूपी रावणाचा पराभव करून, आत्मारामा पर्यंत पोहोचायचे आहे. मार्गावर प्राणरूपी हनुमानाचे सहाय्य घेऊन आपल्याला रामापर्यंत जाता येते. हनुमानासारखी भक्ती, समर्पण आवश्यक आहे.


समाजात रामराज्य आणण्यासाठी असंख्य हनुमानांची मोठी शक्ती हवी, तरच मदोन्मत्त, वासनांध रावणांचा पराभव करता येईल. रावणापेक्षा कितीतरी अनैतिक, धर्मविरोधी, क्रूर रावण आज समाजात आहेत. श्रीराम प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण भक्ती, समर्पण, शक्ती, बुद्धी हे हनुमानाचे सर्व गुण धारण करून आपल्या सर्वाना कार्य करावे लागेल. मगच श्री राम प्रकट होतील.


हिंदू धर्माला बदनाम करण्याचे मोठे कारस्थान जागतिक स्तरावर चालू आहे.
Christian Missionary, Islamic Terrorism, Left Wing Extremism, Anti-National Media हातात हात घालून भारतीय संस्कृती नष्ट करू पाहत आहेत.
इस्लामी आक्रमणात भारतातील मंदिरे, विद्यापीठे, गुरुकुले उद्ध्वस्त केली. ग्रंथ जाळून टाकले व ज्ञान नष्ट केले. कोट्यावधी हिंदूंना ठार मारले, गुलाम केले. ते आक्रमण आपण यशस्वी पणे परतवले.
इंग्रजांनी येथील पुस्तकेच बदलली. शिक्षण पद्धती उद्धवस्त केली. स्वाभिमान व आत्मभान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेच षड्यंत्र आजही चालू आहे.


हिंदू जीवन पद्धती आदर्श आहे. उदा. योग, आयुर्वेद, संस्कुत, देवनागरी लिपी, अर्थ चिंतन, स्त्रियांना सन्मान. संपूर्ण जग याकडे आशेने पाहत आहे.
त्याच वेळी आपल्याच गोष्टींपासून आपल्याला वंचित केले जात आहे. उदा. कोलगेट toothpaste च्या जाहिराती. कोयला, Floride, Chloride, सुरक्षाचक्र, नीम, नामक, चारकोल

प्रत्येक हनुमान भक्ताची कर्तव्ये
१.      जप/ ध्यान
२.      बलोपासना - सूर्यनमस्कार    
३.      सांस्कृतिक अध्ययन
४.      संघटन
५.      सकारात्मक वातावरण निर्मिती

(सूचनांचे स्वागत आहे).