बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

भगवान बिरसा मुंडा Bhagwan Birsa Munda




भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र वंदन !!

बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला.
त्यांचे शिक्षण जर्मन मिशन स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरूण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन
केले.
बिरसा मुंडांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनरी व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकार्‍यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला.
बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.
भगवान बिरसा मुंडांनी हिन्दू धर्म व भारतीय संस्कृतीसाठी खूप कार्य केले. अनेक चमत्कार केले. त्यांच्या केवळ स्पर्शाने अनेकांना रोगमुक्त केले. अध्यात्मिक शक्तींमुळे त्यांना 'भगवान' मानले जाऊ लागले . ते परमेश्वरी अवतार होते.
त्यांच्या प्रभावाने ख्रिस्ती धर्मांतर थांबले व अनेकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला.
इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. त्यामुळेच ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.