सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

kavita on Marathi Brahman

*कोकणस्थांची कविता... तिला देशस्थांचे उत्तर* 

*कोकणस्थांची कविता 😗

मी आहे ब्राह्मण कोकणस्थ
आम्ही कधीच बसत नाही स्वस्थ 

रीतीरीवाजांमध्ये आमचा अव्वल नंबर आहे
आमचीच पालखी प्रत्येक जण वाहे
बचतीचा मार्गच आमचा धर्म आहे.
आम्ही कधीच नसतो अस्ताव्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१!!

वंशपरंपरा आम्ही दांडीवर कपडे टाकतो
पण त्याचा क्रम कधीच बदलत नसतो
बदलला तर आम्ही लगेच पिसाळतो
दुस-या जातीची सून आली तर होतो आम्ही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!2!!

एका काडीनेच गॅस पेटवितो
लगेच दुस-या गॅससाठी ती विझवून ठेवितो
वरण-भाताशिवाय आम्ही जेवत नसतो
त्यानेच जेवण होते आमचे मस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!3!!

लोकमान्य आमच्यातच जन्माला आले
सर्व क्रांतिकारक आम्हीच देशा दिले
स्त्रियांना अण्णासाहेबांनीच उद्धरले
साधू न होता राहतो नेहमी व्यस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!4!!

दादा फाळक्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया घातला
राजा परांजपे यांनी देशभर पसरविला
माधुरीने त्यावर कळस चढविला
असे क्षेत्र नाही जेथे नाही आमचा हस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!5!! 

भांडणातसुद्धा आम्ही कमी नाही
तत्वांसाठी आमचे आयुष्य जाई
वाटण्यांमध्ये झाडूची सुद्धा विभागणी होई
त्यासाठी आम्ही होत नाही त्रस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!६!!

लाचारी करून मागत नाही दान
व्यवहार करतानाही राखतो अभिमान
नेहमी असते आमची ताठ मान
खर्चाला असते आमची कडक शिस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!७!!

गॅस सिलेंडर वर तारीख लिहितो
वेळेआधी संपला तर उपासच घडतो
तोच मग आमचा एकादशीचा दिवस होतो
उपासाला कधीच आम्ही खात नाही जास्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!८!!

महिन्याची पेपर रद्दी मोजून लावलेली असते
वाण्याला तागडीची गरजच नसते
त्याच पैशातून आमची भिशी चालत असते
पै पैसा करून आम्ही घेतो खस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!९!!

चोवीस कॅरेट शिवाय सोने घेत नाही
पेठे-गाडगीळांशिवाय दुसरे दुकान पाहत नाही
दागिन्यांत आमची असते सर्वांवर मात
नाही वापरत आम्ही तांबे-पितळ-जस्त
मी आहे ब्राह्मण कोकणस्थ!!१०!

 *काय बरोबर ना ?* 

*देशस्थांचे उत्तर 😗 

आम्ही देशस्थ💐😀

जग जरी म्हणत असले कितीही बेशिस्त
तरी देखील अभिमानी ..आम्ही देशस्थ
 
नसतो जेवणाला आमच्या वेळ अथवा नियम
अतिथीच्या तृप्तीसाठी राखुन असतो संयम
व्यवहारापेक्षा माणुसकीला असतो व्रतस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

असतील कपडे जरी घरात कुठेही पडलेले
कपड्यांपेक्षा नातेसंबंधच अधिक सांभाळलेले
गदारोळात नात्यांच्या जरी होतो आम्ही त्रस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

चहा झाला असेल ना? असे विचारत नाही
चहासाठी आलेला जेवण करूनच जाई
अघळ पघळ गप्पांमधे नेहमी आम्ही व्यस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

ज्वारी झाली महाग तरी भाकरी चुकत नाही
वरणभातावर भागवण्याची आमची परंपरा नाही
चटण्या भाज्या असल्यावरच जेवण लागते मस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

लग्न कार्य असतो आमचा महिनाभरचा खेळ
नसते कुठले बजेट ,ना हिशोब ना ताळमेळ
उसने देता घेता नसते काळजी किंवा खंत
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

गॅस जरी संपला तरी उपाशी रहात नाही
अडचणीला देशस्थाचाच शेजार धावून येई
वसुधैव कुटुंबावर असते नेहमीच भिस्त
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

"आला सण की घाल पुरण" अशी आमची रीत
पोळीवरती डावभर तूप .,,आम्ही नाही भीत!
हौसे पुढे कुठे असते महाग आणि स्वस्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

सोने कसले घेता? जपतो सोन्यासारखे क्षण
पैसा प्रतिष्ठेहून मोलाचे समोरच्याचे मन
अंत्ययात्रेची गर्दी सांगे..आम्ही किती श्रीमंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

गदिमांच्या शब्दांसाठी फडक्यांच्या चाली
चितळ्यांना मोठं करते देशस्थाचीच थाळी
आमची इन्फोसीस सांभाळते किती कोकणस्थ!
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

ऋषी मुनींची परंपरा रक्तामधे खेळते
आर्यधर्माचे बाळकडू गर्भामधेच मिळते
देशस्थातच जन्मा येती किती संतमहंत!
मी आहे ब्राह्मण देशस्थ

भाषा आमची माउलींची जणू इंद्रायणी
भक्ती प्याली नाथाघरच्या हौदामधले पाणी
ठामपणा शिकवत राही ..रामदासांचे ग्रंथ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

क्रांतीकारक काय फक्त कोकणात जन्मा येतात?
फासावरले राजगुरू काय तुमचे काका लागतात?
नथुरामाचे रामायण ...काय सांगू जास्त?
मी आहे ब्राह्मण देशस्थ

कर्वे असतील मोठे, पण आमचे आमटेही महान!
माधुरीला झाकोळेल.. गंधर्वांची शान!
तरी देखील माजवत नाही कुठले आम्ही प्रस्थ
मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

वसिष्ठांच्या छाटीला तर सूर्याइतकी दीप्ती
कमंडलूत समुद्र त्यांच्या , धरणी कुबडीवरती
सागराचे प्राशन करी आमच्यातला अगस्त्य 
मी आहे ब्राह्मण देशस्थ !! 

आमच्या देशस्थीची आगळीच आहे शान
कुठेही जा, देशस्थांनाच मिळतो अधिक मान
*"आमचे वागणे देशस्थीच" असे सांगतात कोकणस्थ*
मी आहे ब्राह्मण देशस्थ !! मी आहे ब्राह्मण देशस्थ !!

👆🏻👆🏻👆🏻
ह्याला माझ्या शाळेतील कऱ्हाडे मित्राच - अनिल खांडेकर - स्वरचित उत्तर 😀😀👇🏻👇🏻👇🏻

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे 
कोकणात, देशावर, सर्वदूर आमची बिऱ्हाडे  

अतिथी देवो भव: असा आमचा शिरस्ता

पोटातून हृदयाकडे जातो म्हणे प्रेमाचा रस्ता 

ओळखी इकडे तिकडे चोहीकडे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

भेटीगाठी ठरल्या की आधी भोजनाची चर्चा 

खमंग स्वादिष्ट जेवणात आमचा नंबर वरचा!

आमच्यात पुरुषही झकास रांधे-वाढे,

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

साधेपणा आणि नीटनेटकेपणा आमच्या अंगी 

उधळपट्टी कमी, तरी बेत सारे जंगी

कलागुणांची आवड आमच्याकडे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

फार ढिसाळ कारभार नाही, ना कडक शिस्त 

तरी चोख काम करण्यावार आमची भिस्त

ना अतिरेक काटकसरीचा, ना खर्चाचे राडे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

पक्वान्न नसली तरी चालतील, आमटी आमची जीव कि प्राण

शेजाऱ्यांशी चालू असते पदार्थांची देवाण घेवाण 

सगळं असलं तरी काहीतरी हवं डावीकडे,

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे! 

आलं गेलं सतत हवं तरच ते घर, असा आमचा नियम

आज हे येणारेत उद्या त्यांच्याकडे जायचंय चालू असतं कायम 

कुणाकडे गेल्यावर मदतीला सरसावतो पुढे 

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

मावस बहिणीचा मामेदीर तो चुलत भावाचा मावसभाऊ

नात्यांची कोडी घालत, सोडवत एकमेकांना धरून राहू

अर्धा वेळ गप्पा ह्याच, कधी गेलो कुणाकडे..

 मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे!

खांडेकर, किर्लोस्कर, पराडकर, आणि सप्रे

महान व्यक्तींची यादी संपतच नाही बापरे!

पाध्ये, पंत, ठाकूरदेसाई आणि श्रीखंडे

मी आहे ब्राह्मण कऱ्हाडे! 

- अनिल खांडेकर
विलेपार्ले,
 Santosh Kulkarni: म्हणूनच म्हणतोय संगम होऊ देत तिघांचा
आपण सुखी समाज सुखी आणि देश सुखी
एक परिपूर्ण प्रेमाचा गोड संगम

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

rushi panchami ऋषी पंचमी

 ऋषी पंचमी, भाद्रपद शु. ५,

ऋषी नां नैवेद्य.
ऋषी- मुनी हे प्राचीन काळापासून चे थोर संशोधक.
अध्यात्म, विज्ञान, मानसशास्त्र, शेती, जीवशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक विषयावर त्यांनी मुलभूत संशोधन केले. मानवाला प्रगत बनवले. बहुतेक ऋषी विवाहित होते, पण अत्त्यंत साधे रहात.
परस बागेतील भाजी पाला व अन्न धान्यावर जगत. They had almost zero carbon footprint.
आज त्यांचे स्मरण करायचे व त्यांच्या सारखा साधा आहार घ्यायचा.
सर्वांनी हे व्रत प्रतिवर्ष अवश्य करावे!