मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

अंगारकी संकष्टी चतुर्थी

आज संकष्टी चतुर्थी आहे, तीही अंगारकी.
’संकष्टी’ आणि ’विनायकी’ या गणेशाच्या उपासनेसाठी फार महत्वाच्या तिथी आहेत. विनायकी ही शुक्लपक्षाच्या चतुर्थीला मध्यानी पर्यंत असते. आणि चंद्रोदयाच्यावेळी कृष्णचतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. आजच्या संकष्टीची विशेषत: ही आहे की ती मंगळवारी आहे, म्हणून ती पुण्यप्रद मानली जाते.

गणेशाचा रंग लाल, मंगल ग्रहाचा रंग लाल, व पहिले चक्र 'मूलाधार चक्र' त्याचा रंग हि लाल (रक्त वर्ण).

"त्वं मूलाधार स्थितोsसिनित्यं |" गणेशाचे शरीरातील स्थान असते मूलाधार चक्रात.
या चक्राचे स्थान आहे गुद आणि जननेन्द्रिय यांच्या बरोबर मध्ये. याच चक्राच्या ऊर्ध्वभागात कुंडलिनी असते असे वर्णन ज्ञानेश्वर माउली करतात.

कोणत्याही धार्मिक विधीत अग्रपूजेचा मान असलेला गणपती पहिल्याच चक्राची अधिष्ठात्री देवता आहे. चक्राचा बीजमंत्र आहे ‘लं’ तसेच स्वर आहे ‘सा’. गणेश ओमकार स्वरूप आहे.
गणेश हे पृथ्वी तत्वाशी/ जडत्वाशी संबंधित आहेत. म्हणूनच त्यांना तुंदिल तनु मानले आहे.
मूलाधार चक्र हे अपान वायूच्या क्षेत्रात येत असल्याने; शुक्र- आर्तव- मल आणि मूत्र विसर्जन तसेच अपत्यजन्म प्रक्रियेसारख्या अपान वायूशी संबंधित असलेल्या क्रिया या चक्राच्या क्षेत्रात येतात.
मूलाधार चक्राशी स्थित असलेले श्रीगणेश आपणा सर्वांना क्षेम, समृद्धी, बुद्धी व आरोग्य देवोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा