शुक्रवार, २५ जून, २०२१

Vat Pournima Marathi

 सत्यवानाची सावित्री होऊ नको - फुल्यांची सावित्री हो


असा 'उपदेश' काही अति शहाण्यांनी केला.


हे योग्य नाही.


सत्यवानाची सावित्री ही एक महान स्त्री होती. तिने मरू घातलेल्या नवऱ्याला मरू दिले नाही.

संकट काळात सुद्धा तिने धीर सोडला नाही.


तिचा यमाशी संवाद उच्च अध्यात्मिक पातळी दाखवतो. तिचा आरोग्याचा असामान्य अभ्यास पाहून तिचा गौरव केलेला आहे.


ती वैद्यक शास्त्रात अतिशय निपुण असली पाहिजे. सत्यवानही तिच्याकडे आधी रूग्ण म्हणून आला मग ही त्याच्या प्रेमात पडली असे घडले असा तर्क करता येतो.


तिने धैर्याने त्याच्याशी लग्न केले, सासुसासऱ्यांचे अंधत्व दूर केले आणि त्याचाही विकोपाला गेलेला आजार बरा केला. वास्तविक लोक सूत धरून बसलेले पण हिचे धैर्य आणि आपल्या ज्ञानातून आलेला आत्मविश्वास अपूर्व होता. सत्यवान मेला नाही, उठून बसला.


हा एक विषय. दुसरे. तिने जबरदस्त डावपेच लढवले आणि ह्या तिघांच्या आजारपणात गेलेले राज्य तिने परत मिळवले.


भावना, बुद्धी, धैर्य आणि विज्ञान तिच्या अंकित होते.


ज्यांना म. फुल्यांसारखा नवरा मिळेल त्या मुलींना सावित्रीबाई फुले व्हायची संधी असेल. ती संधी जिला मिळेल तिने अवश्य तसे व्हावे.


पण आपल्या अविवाहित लहान मुलींसमोर आदर्श उभा करायचा असेल तर तो सत्यवानाच्या सावित्रीचाच केला पाहिजे.


अंधश्रद्ध होऊ नका,


अश्रद्ध होऊ नका.


स्वतःला बुद्धिवादी म्हणणारे त्यांची बुद्धी लोकांवर लादत असतात


त्यांना बळी पडून आपल्या अपत्यांचा बुद्धिभेद करू नका.


आणि स्वतःलाही अशांपासून सांभाळा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा