बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

part 5

*सहा सोनेरी पाने*
*स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर*
भाग-५
*भारताची तत्कालीन व्याप्ती*

दोन अडीच हजार वर्षापूर्वी सिंधू नदीच्या पलिकडे अगदी इराणच्या सीमेपर्यंत भारतीयांची वस्ती आणि राज्ये पसरलेली होती.
हिंदूकुश पर्वताला ग्रीक परोपनिसस(Paropnisus) म्हणत. आजचे अफगाणिस्थान तेव्हां *गांधार* होते. काबूल नदीचे आपले प्राचीन नाव *कुभा* होते. हिंदुकुश पर्वतापासून सिंधू नदी समुद्राला जेथे मिळते तेथपावेतो, तिच्या दोन्ही काठांना वैदिक धर्मानुयायी भारतीयांची लहान मोठी स्वतंत्र राज्यांची मालिका पसरलेली होती. ही बहुतेक राज्ये लोकसत्ताक पध्दतीची प्राजके(Republics) होती. त्यांना गणराज्ये म्हणत. राजसत्ताक पध्दतीची दोन/तीनच राज्ये होती त्यातील पौरव राजाचे राज्य सगळ्यात मोठे होते.
ग्रीक पुराणाचा आधार घेतला तर, त्यात अस म्हटल गेलय की, सिंधुपलीकडील गांधार प्रांतातून भारतातील आर्यवंशी जानपदाची एक तुटक शाखा ग्रीसकडे गेली. अलेक्झांडरचे सैन्य जेव्हां या भागात आले तेव्हां, स्वत:ला ग्रीक समजणारा एक लहानसा समुह त्यांना आढळला. अलेक्झांडरलाही आपल्या प्राचीन पूर्वजांचे हेच मूळ ठिकाण असे वाटले. ग्रीक सैन्याला आपल्या पितृभूमीचे दर्शन झाल्याचा इतका अत्यानंद झाला की युध्द बंद करून त्यांनी महोत्सव साजरा केला. ग्रीकांच्या देवतांचे, वैदिकांच्या देवतांशी अत्यंत सादृश्य होते. खूप साम्य होते. देवतांच्या नावाचे उच्चार अपभ्रंशामुळे वेगळी वाटत इतकेच. ग्रीकही यज्ञे, हवने करीत. ग्रीकांना आयोनियन्स म्हणत. *आयोनियन्सवरून यवन* शब्द पडला.
 ययातीचा पुत्र अनु ह्याचेच ग्रीक लोक वंशज असतील का ? 😊 अन्वायन-आयोनियन अशी अपभ्रष्ट रूपे होत गेली असतील का ? हा संशोधनाचा विषय आहे, संशोधकांनाच सोडवू दे. 

परंतु *ग्रीक म्हणजेच यवन. मुसलमान किंवा सर्वच परराष्ट्रीय आक्रमकांना यवन म्हणणे चूकीचेच.*
आणखी एक खुलासा इथे करावासा वाटतो.
गांधारपासून पंचनद(पंजाब) पर्यंत, तेथून सिंधू नदी समुद्रास मिळते तेथपर्यंत, ज्या ज्या भागात अलेक्झांडरचा संचार झाल्याची वर्णने ग्रीक लेखकांनी केली आहेत त्यात वैदिक धर्मानुयायांचे उल्लेख आहेत, परंतु बुध्द किंवा बुध्दपंथाचा चुकूनसुध्दा उल्लेख नाही. यावरून बुध्दाच्या मृत्यूनंतर २५०/३०० वर्षापर्यंत मगध प्रांतातच बुध्दपंथाचा प्रसार झाला होता, त्यापलिकडे त्याचे पाऊलही पडलेले नव्हते हे स्पष्ट होते. पुढील इतिहास बघताना ही बाब लक्षात ठेवावी लागेल.
(क्रमश:)
              रविकांत करंदीकर.

Saha soneri pane part 6

*सहा सोनेरी पाने.* 
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.* 
भाग-६
परकीय, आक्रमक,आणि अंशत: परधर्मिय ग्रीकांना, भारतीय लोक *यवन* म्हणत. पण मुसलमानांना यवन म्हणणे चूकीचेच ठरेल. आक्रमक व परकीय असले तरी त्यावेळी ग्रीक सापेक्षत: विद्याव्यासंगी व सभ्य जगतात मोडत होते. मुसलमानांच्या टोळधाडी धर्मांध, रानटी नि विध्वंसक अशा राक्षसी वृत्तीच्या होत्या. त्यामुळे मुसलमानांना यवन म्हणणे, यवन शब्दाची पायमल्लीच होईल.

तस म्हटल तर विनोदाचा भाग म्हणायला हवा अशा एका गोष्टीचा स्वातंत्र्यवीरांनी उल्लेख केला आहे.

पारसिक लोक अलेक्झांडरला सिकंदर म्हणून ओळखत. पारसिक लोक आपल्या मुलांचे नाव सिकंदर ठेवत. नंतर मुसलमानांनी पर्शिया काबीज केला. तेव्हांपासून मुसलमानांना अस वाटायच की अलेक्झांडर(सिकंदर) आपल्यातलाच होता. त्यामुळे तेही आपल्या मुलांचे नाव सिकंदर अस ठेवायला लागले. *जो जीता वही सिकंदर* सारख्या उक्ति त्यामुळेच तयार झाल्या. 
खर म्हणजे *जो जीता वही सिकंदर नाही तर चंद्रगुप्त* वगैरेसारख्या उक्ति आता आपण वापरायला हरकत काय ? (हे मी म्हणतोय हं😊)
(क्रमश:)
               रविकांत करंदीकर.

saha soneri pane part 7

*सहा सोनेरी पाने* 
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.*
भाग-७

तक्षशिलेचा राजा *अंबुज(अंभी)* याने अलेक्झांडरचे मांडलिकत्व, *पौरस राजाचा* बिमोड करण्यासाठी स्वीकारले. नंतर *पौरस राजाचा* पराभव, पौरसाने अलेक्झांडरला दिलेले बाणेदार उत्तर, अलेक्झांडरने दाखवलेला दयाळूपणा, वगैरे इतिहास मोठ्या हुशारीने आपल्याला शाळेतील इतिहासात तेव्हांच्या शिक्षण तज्ञांनी शिकवला आहेच. अलेक्झांडरचे भाट असलेल्या तत्कालीन ग्रीक इतिहासकारांनी तो प्रसंग तसा लिहीला आणि पाश्चात्यांचे भाट असलेल्या आमच्या शिक्षण तज्ञांनी(?😡) तो भाग तसाच्या तसा उचलून आम्हाला शिकवला.
पौरसाला त्याचे राज्य परत देण्या मागची खरी मेख वेगळीच होती. अलेक्झांडरसाठी ती राजकीय अपरिहार्यता होती.
स्वप्नात राज्य दिले म्हणून जागेपणीही राज्य देऊन टाकायला अलेक्झांडर कोणी भाबडा,सत्यवचनी वगैरे राजा नव्हता.
अलेक्झांडरचे लक्ष्य त्या काळातील, भारतातील सर्वात मोठे व शक्तिशाली राज्य मगध आणि त्याची राजधानी पाटलीपुत्र हे होते. जर पौरसाला ठार मारले, किंवा पदच्युत करून आपला कोणी क्षत्रप(त्याला ग्रीक राज्यपाल किंवा गव्हर्नर म्हणता येईल)त्या राज्यावर बसवला तर, त्या राज्यातील स्वाभिमानी भारतीय जनता ग्रीकांच्या द्वेषाने खवळण्याची शक्यता जास्त होती. त्याचा शिकंदराला त्रासच झाला असता. त्यामुळे कौतुक, दयाळूपणा वगैरे ग्रीकांनी लिहीलेल्या भाकड कथा आहेत हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.
हे सगळ चालू असताना, त्यावेळी आणखी थोड वेगळ काय घडत होत ते पाहूया.
अलेक्झांडर भारतावर स्वारी करण्याच्या फार पूर्वीपासून संपूर्ण जगात भारतातील काही विद्यापीठे खूप प्रसिध्द होती. त्यापैकी एक म्हणजे तक्षशिला विद्यापीठ. देशोदेशीचे विद्यार्थी एवढेच नव्हे,तर परदेशी राजपुत्रही या विद्यापीठात राज्यशास्त्र, युध्दशास्त्र यांचे शिक्षण घेत असत. 
योगायोगाने अलेक्झांडरने भारतावर चाल करून तक्षशिला ताब्यात घेतली तेव्हां, एक तेजस्वी, तरतरीत तरूण या विद्यापीठात शिक्षण घेत होता किंवा नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडला होता. त्याला राज्यशास्त्राचे, राष्ट्रीय क्रांतीकार्याचे शिक्षण देत होते एक प्रौढ पंडित. 
शिकंदराच्या स्वारीच्या हलकल्लोळात ही सामान्य दिसणारी, दोन असामान्य माणसे कोणाच्याही नजरेत भरलेली नव्हती.
शिकंदर जेव्हां भारतातील रावरावळांचे, राजा महाराजांचे मुकुट एकत्र करून, वितळवून स्वत:साठी, भारतीय सम्राटपदाचा महामुकुट तयार करण्याचे स्वप्न बघत होता तेव्हां, आयताच तयार होणारा तो मुकुट त्याच्याकडून हिसकावून घेऊन, आपल्या तरूण शिष्याच्या डोक्यावर कसा ठेवता येईल याच्या योजना जे प्रौढ आचार्य मनोमन करीत होते, ते होते, *आचार्य चाणक्य.*
(क्रमश:)
                  रविकांत करंदीकर.

Navaratri

🔶 *👍नऊ संख्या 👍आणि नवरात्र👍अध्यात्मिक संबंध👇आणि🌹 महत्त्व 🌹👇*

■ *नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू,ज्वारी,बाजरी,मका,मूग,हरभरा,जवस,मटकी.*

■ *दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री,ब्रह्यचारिणी,चंद्रघंटा,कुष्मांडा,स्कंदमाता,कात्यायिनी,कालरात्री,महागौरी,सिद्धिरात्री.*

■ *दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं :अंबा,चामुंडा,अष्टमुखी,भुवनेश्वरी,ललिता,महाकाली,जगदंबा,नारायणी,रेणुका.*

■ *महाराष्ट्रातील देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई),महालक्ष्मी (डहाणू),महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी),रेणुकादेवी (माहूर),महालक्ष्मी (कोल्हापूर),तुळजाभवानी (तुळजापूर),योगिनीमाता (अंबेजोगाई),श्री एकवीरादेवी (कार्ला).*

■ *नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल,निळा,पिवळा,हिरवा,राखाडी,भगवा किंवा केशरी,पांढरा,गुलाबी, जांभळा.*

■ *नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई,पलाश,खदिर,अपामार्ग,पिंपळ,औदुंबर,शमी,दुर्वा,कुश.*

■ *नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक,मोती,प्रवाळ,पाचू,पुष्कराज,हिरा,नीलमणी,गोमेद,वैडूर्य,पीतवर्ण-मणी.*

■ *‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान,धनदान,भूदान,ज्ञानदान,अवयवदान,श्रमदान,रक्तदान,वस्त्रदान,देहदान.*

■ *नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार :श्रवण,कीर्तन,स्मरण,अर्चन,पादसेवन,वंदन,सख्य,दास्य,आत्मनिवेदन.*

■ *प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष,वासुकी,तक्षक,शंखपाल,कालिया,कर्कोटक,पद्मक,अनंत,पद्मनाभ.*

■ *समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व),केतुमालखंड (पश्चिम),रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर),वृत्तखंड (आग्नेय),द्रव्यमालखंड (नैऋत्य),हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य),सुवर्णखंड (मध्य).*

■ *मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय,शब्दमय,प्राणमय,आनंदमय,मनोमय,प्रकाशमय,ज्ञानमय,आकाशमय,विज्ञानमय.*

■ *मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य,सामर्थ्य,भ्रांती,कल्पना,वैराग्यवादी,सद्विचार,रागद्वेषादी असद्विचार,क्षमा,स्मरण,चांचल्य.*

■ *मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था,गर्भावस्था,जन्म, बाल्य,कौमार्य,तारुण्य,प्रौढत्व, वृद्धत्व.*
*-----------------------*