मुहूर्त
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण मुहूर्त काढून गणेशाचे पूजन करून करतो तोच संस्कार, विधी आम्ही मुहूर्ताच्या वेळी केला. त्यामध्ये हळद, उडीद कुटणे जात्यावर दळून साधारण फोडून घेणे. उडदाचे पापड, सांडगे,वेगवेगळ्या प्रकारचे गवले, मालत्या, नखुल्या काढल्या, ज्याची ग्रहमखा च्या दिवशी खीर केली जाते.आणि लग्न लागून पाठवणीच्या वेळी मालत्यांनी लेकीची ओटी भरायची.
त्यादिवशी मुद्दामून मेतकूट दळलं जातं त्याच्यामागचा विचारच मला इतका आवडला विवाह म्हणजे फक्त नवरा नवरी अशी संकल्पना कधीच नव्हती तर दोन कुटुंबांनी एकत्र येऊन आणि एकजीव होऊन जाणे, नकळतपणे मुला-मुलींना हाच संस्कार देणं हीच त्या मेतकूट दळण्यामागची संकल्पना. तसं पाहिलं तर मेतकूट बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी एकत्र केल्या जातात प्रत्येकीचा गुणधर्म, स्वभाव हा वेगळा असतो पण जेव्हा सगळे एकत्रित होतात तेव्हा त्यातलं द्वैत संपत आणि एकरूपता येते हेच त्याचे प्रतीक
#2
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा